Saturday, February 14, 2009

इडली चटणी

इडली साहित्य

१ कप उडदाची दाळ
३ कप इडली राव
१ चमचा मेथी दाणे

चटणी साहित्य
१/२ ओला नारळ
३-४ हिरव्या मिरच्या
१० पाने कढीपत्ता
२ चमचे भाज्के डाळे
थोडी कोथमीर
चवीपुरते मीठ

कृति

उडदाची डाळ आदल्या दिवशी भिजत घालावी। रात्रि डाळ बारीक़ वाटावी । इडली रवा अर्धा तास अगोदर भिजवावा।
डाळ वाटल्यावर तो पण जरा मिक्स़र मधून काढावा । दोन्ही एकत्र करून हातानी चांगले फेसावे। मेथी दाणे आणि मीठ घालून रात्रभर आम्बवण्य्साठी झाकून ठेवून द्यावे। सकाळी इडली पात्राला तेलाचा हाथ लावून नेहमीप्रमाने इडल्या कराव्या । चटणी बरोबर सर्व कराव्या।

Tuesday, February 3, 2009

गाजर हलवा


साहित्य

१ किलो गाजर
१५० ग्राम मावा
४०० ग्राम साखर किव्हा चविप्रमाने
१ चमचा साजुक तुप
१/२ वाटी दूध
वेलची जायफल पाउडर
सजावटीसाथी सुका मेवा

कृति

गाजर सोलून किसुन घ्यावीत। भांड्यात १ चमचा तुप घालून गाजराचा किस थोड़ा परतावा। झाकण ठेवून १ मिनट वाफ्वावा। दूध घालावे, साखर घालावी। चांगले हलवावे। हलवा शिजला की मावा किसुन घालावा। वेलची-जायफल पाउडर आणि सुका मेवा घालावा।