Friday, January 9, 2009

मंगल प्रभात


आमची सकाळ मंगल प्रभात ह्या रेडियो वरच्या कार्यक्रमाने होत असे... प्रभाते सुर अति रंगती दश दिशा भूपाली वदति, किंवा उठी श्री रामा, पहाट झाली, पूर्व दिशा ..... ह्या सर्वा मधले मला शेवटी लागणारे लक्ष्मी शंकर हिने
गायलेले माटी कहे कुम्हारसे हे भजन फार आवडत असे... सुधीर फडके ह्यांची सगळी गाणी मला फार आवडत....
आमच्या शेजारचे एक काका तेव्हा त्या सगळ्या गीताना देवाची गाणी असे म्हणत ...आजकालच्या मुलाना आपण असे काही सांगितले तर कळत नाही किंवा त्याना त्याचे काही विशेष वाटत नाही, टीवी आणि टेलीफोन शिवाय तुम्ही कसे जगत होतात असे त्याना वाटते, आताच्या जनरेशन ला हे कधी समजणार नाही कारण आता गावातपण केबल टीवी आला आहे. सकाळी उठल्यावर शेजारच्या प्राजक्ताची फूले वेचायची हा शाळेत जायच्या अगोदर चा आमचा रोजचा दिनक्रम असायचा, केशरी देठ असलेली नाजुक फूले मला फार आवडत ...
आमची शाळा घरापासून लांब होती, आम्ही रस्त्यात दोघीतिघी मुली एकत्र जात असू... तेव्हा रस्त्यावर विशेष रहदारी नसायची... रोज कामावर जाणारी ठराविक माणसे ठराविक अंतरावर दिसत... आता मुलीना घेउन कधी त्या रस्त्यावर चालले की सगळ्या आठवणी जाग्या होतात...

No comments:

Post a Comment